Trek for the Scout and Guide students of class IX at Kankeshwar, Alibaug

निसर्गात रमले सरस्वती शाळेचे विद्यार्थी

सरस्वती विद्यालय, राबोडी, ठाणे तर्फे इयत्ता नववीच्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी कनकेश्वर, अलिबाग येथे ट्रेक आयोजित करण्यात आला होता. मुला-मुलींमध्ये नेतृत्वगुण, टीमवर्क, आत्मविश्वास आणि निसर्गाची जाणीव वाढवणे हा यामागील उद्देश होता.

ट्रेकिंग आणि ॲक्टिव्हिटीजमुळे मुला-मुलींची शारीरिक ताकद वाढते आणि ताणतणाव कमी होतो. ट्रेकमध्ये मुलांना वेगवेगळ्या कामांची जबाबदारी दिली जाते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता आणि टीममध्ये काम करण्याची सवय लागते.स्वतःच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न आणि अडचणींवर मात केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो.निसर्गाच्या सानिध्यात राहून मुला-मुलींना पर्यावरणाचे महत्त्व समजते आणि ते निसर्गाबद्दल अधिक जागरूक होतात.

ट्रेकमध्ये मुलांना वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांची सामाजिक जाणीव वाढते. मुला-मुलींना आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे, स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि इतरांना मदत कशी करावी हे शिकायला मिळते.

या सर्व उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी शाळेने हा ट्रेक आयोजित केला होता. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुनम भोगले मॅडम, शाळेचे समन्वयक सौ राखी खन्ना मॅडम, श्री.कपिल कुळकर्णी सर तसेच ऍडमिन हेड सौ देवयानी शुक्ला मॅडम, श्री विनायक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हा ट्रेक यशस्वी होण्यासाठी स्काऊट गाईडचे शिक्षक व इयत्ता नववीचे सर्व वर्गशिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Trek for the Scout and Guide students of class IX at Kankeshwar, Alibaug

Trek for the Scout and Guide students of class IX at Kankeshwar, Alibaug

Trek for the Scout and Guide students of class IX at Kankeshwar, Alibaug

Trek for the Scout and Guide students of class IX at Kankeshwar, Alibaug

Trek for the Scout and Guide students of class IX at Kankeshwar, Alibaug

Contact Us

S A R A S W A T I

Loading