ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा होणारा 'मराठी भाषा गौरव दिन' दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सरस्वती विद्यालयात मराठमोळ्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला शाळेच्या माजी निवृत्त शिक्षिका तसेच माजी मराठी विभाग प्रमुख श्रीमती संध्या देशमुख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूनम भोगले, समन्वयक सौ. राखी खन्ना, श्री. कपिल कुळकर्णी , शाळेचे कार्यालयीन प्रमुख श्री. विनायक शिंदे उपस्थित होते.
'माय मराठी अमुची' या समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी मराठीतील दिग्गज कवींच्या कवितांचे काव्यवाचन केले. नंतर विद्यार्थ्यांनी कथा वाचन सादर केले. मराठी विभाग प्रमुख सौ. रेखा नलावडे यांनी' मराठी भाषा कशी जतन करावी या विषयावर आपले मनोगत मांडले.यानंतर शाळेचे समन्वयक श्री. कपिल कुळकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. केले. यानंतर सादर झालेला एकपात्री प्रयोग हा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. त्यानंतर मी मराठी या गीतावर समूहनृत्य सादर झाले. त्या नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूनम भोगले यांनी मराठी भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर प्रमुख पाहुण्या श्रीमती संध्या देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आभार प्रदर्शन झाले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Loading