भारत विकास परिषद ही संस्था संपूर्ण भारतभर शाळांद्वारे विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवते. शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन ही संस्था करतेच याखेरीज विशेष उल्लेखनीय 'गुरुवंदना' आणि 'छात्र अभिनंदन' हा उपक्रमही या संस्थेद्वारे राबवण्यात येतो, ज्यामध्ये एका गुरूचा आणि विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो. यावर्षी सरस्वती विद्यालय, राबोडी शाळेतील अनुभवी, विद्यार्थीप्रिय, गुणवंत शिक्षिका सौ. रेखा शशिकांत नलावडे आणि अतिशय गुणी तसेच गिटार वादनात निपुण असणारी इयत्ता दहावीची विद्यार्थी कुमारी प्रिशा अंकुर चाफेकर यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. ही शाळेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. गुरु म्हणून सौ. रेखा शशिकांत नलावडे छात्र म्हणून प्रिशा अंकुर चाफेकर यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
Loading