�� सामुहिक पसायदान पठण सोहळा ��
वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे तेराव्या शतकातील महान संत, योगी आणि तत्वज्ञ, श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीच्या 18 व्या अध्यायाच्या समारोपात ' पसायदान' ही विश्व कल्याणासाठी प्रार्थना लिहिली आहे. धर्म,पंथ, काल या बंधनांच्या पलीकडे जाऊन सर्वकालीन मानवाच्या कल्याणासाठी विश्वेश्वराकडे मागितलेले दान म्हणजेच पसायदान! ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी, सरस्वती विद्यालय, राबोडी, ठाणे येथे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी पसायदानचे सामूहिक पठण केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील संगीत आणि कला विभागाचे शिक्षक तसेच विद्यालयातील संगीत प्रेमी विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. पूनम भोगले मॅडम, माध्यमिक विभागाचे समन्वयक श्रीमती राखी खन्ना, श्री कपिल कुळकर्णी, ऍडमिन हेड श्री. विनायक शिंदे यांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात हा सामूहिक पठणाचा सोहळा संपन्न झाला.
Loading