भक्ती व श्रद्धेची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी व आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ही भक्तीभावाची संस्कृती रुजवावी या हेतूने यावर्षी सरस्वती विद्यालय, राबोडी तर्फे दि. ७ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. या वेळी पारंपारिक वेशातील विद्यार्थी, लेझीम पथक, बँड पथक यांच्या बरोबर शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुनम भोगले मॅडम, माध्यमिक विभागाचे समन्वयक श्रीमती राखी खन्ना, श्री कपिल कुळकर्णी, ऍडमिन हेड श्री. विनायक शिंदे दिंडीत सहभागी झाले होते.
संतांनी ओव्या, अभंगांतून निसर्गाची महती गायली आहे. त्यामुळे पारंपरिकतेला सामाजिकतेची जोड देऊन यावेळी पर्यावरणाचे संतुलन या विषयावरील, तसेच सामाजिक भान जपणाऱ्या घोषवाक्यांचे फलक वापरून दिंडीतून एकप्रकारे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मैदानात रिंगण सोहळा पार पडला. विठ्ठलाच्या अभंगात, टाळ मृदंगाच्या तालावर अवघा शालेय परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
Loading