आषाढी एकादशीच्या निमित्ताने ०७ जुलै २०२५ रोजी सरस्वती विद्यालय, राबोडी (पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग) येथे वृक्षदिंडी व वारी कार्यक्रम विद्यालयाच्या सीईओ व विद्यालयाच्या आधारस्तंभ मॅडम कोरडे, व्यवस्थापिका दिपाली पाटील, प्राचार्या पूनम भोगले, समन्वयिका मीनाक्षी बंगेरा व रुपाली पवार व प्रशासन प्रमुख देवयानी शुक्ला व विनायक शिंदे यांच्या उपस्थित व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पाडला.
जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून झाडांचे महत्व आपल्याल्या समजावले आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर वृक्ष संगोपनाचे महत्व बिंबवले. वारीच्या माध्यमातून विठ्ठल व रुक्मिणी देवी व अनेक संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. यातून संताचे कार्य व त्यांनी जगाला दिलेली शिकवण यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्याच्या उत्साह आणि जल्लोष या कार्यक्रमात ओसंडून वाहत होता. जणू काही पंढरी विद्यालयाच्या प्रांगणात निर्माण झाल्याची जाणीव होत होती. ‘याची देही याची डोळा’अशी अनुभूती पाहायला मिळाली.
Loading